आपला जिल्हा

नाफेड व एनसीसीएफमार्फत हमीभावाने कांदा खरेदी सुरू करा : आमदार विवेक कोल्हे यांची मागणी

संपादक संदिप विदुर 9975774040

नाफेड व एनसीसीएफमार्फत हमीभावाने कांदा खरेदी सुरू करा : आमदार विवेक कोल्हे यांची मागणी

कोपरगाव प्रतिनिधी संदिप विदुर – कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसह राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये नाफेड व एन.सी.सी.एफ मार्फत हमीभावाने कांदा खरेदी तात्काळ सुरू करावी, अशी मागणी आमदार विवेक कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
विवेक
आमदार विवेक कोल्हे यांनी मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की,कोपरगाव तालुक्यासह महाराष्ट्रातील बहुतांश शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा पिकाचे उत्पादन घेतात. मात्र सध्या कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण झाल्याने शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. शेतीच्या उत्पादन खर्चात सातत्याने वाढ होत असताना कांद्याला मिळणारा कमी दर हा शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. अनेक शेतकऱ्यांना आपला कांदा उत्पादन खर्चापेक्षाही कमी दराने विकावा लागत असल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
सदर परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती कोपरगाव तसेच राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये नाफेड व एन सी सी एफ मार्फत हमीभावाने कांदा खरेदी प्रक्रिया तात्काळ सुरू करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. या खरेदीमुळे बाजारभाव स्थिर राहण्यास मदत होईल तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या कांदा उत्पादनाला योग्य व हमीभाव मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.
शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून कृषी उत्पन्न बाजार समिती कोपरगावसह राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये नाफेड व एनसीसीएफ मार्फत हमीभावाने कांदा खरेदी लवकरात लवकर सुरू करण्याबाबत संबंधित यंत्रणांना आवश्यक निर्देश द्यावेत,अशी मागणी आमदार विवेक कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

संदीप विदुर

सदर न्युज महाराष्ट्र मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - संदीप विदुर 9975774040

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!