आपला जिल्हा

तर समाजाला योग्य वाट दाखवणारा दीपस्तंभ असतो – डॉ.  हिरालाल महानुभाव

संपादक संदिप विदुर +91 99757 74040

तर समाजाला योग्य वाट दाखवणारा दीपस्तंभ असतो – डॉ.  हिरालाल महानुभाव

कोपरगाव तालुका प्रतिनिधी संदिप विदुर – प्रभू श्री.रामा पासून ते स्वातंत्रवीर सावरकर कोपरगावात आलेले आहेत. त्यामुळे कोपरगावला मोठा ऐतिहासिक, सांस्कृतिक, साहित्यिक, राजकीय वारसा आहे.कोपरगावामुळे मला कवितेच्या क्षेत्रात कामं करत असतांना मोलाचे योगदान लाभले आहे.तसेच निवडणुकीत ज्या गावाने आम्हाला शंभर टक्के मतदान दिले त्यामुळे त्या गावाच्या वृणात आम्ही आहोत. कोपरगावात पुढील वेळी 500 मत असले पाहिजे. आता भारतीयत्वाच्या मूळ अस्मितेशी आणि स्वभावाशी जुळणारा प्रवाह आता सुरू झाला असून, ज्याप्रमाणे ज्ञानोबा, तुकोबा, एकनाथ आणि चोखोबा या संतांनी एकत्रितपणे अभंग-ओव्यांच्या माध्यमातून जनसामान्यांचे विचार मांडले, तोच विचार पुढे नेण्याचे कार्य साहित्याच्या माध्यमातून आपल्याला करायचे असल्याचे मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांनी व्यक्त केले आहे.

d
येथील इंडियन सोसायटी ऑफ ओर्थर, नवी दिल्ली व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा कोपरगाव यांच्या वतीने अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा जाहिर नागरी सत्कार सोहळा’ नुकताच येथील एन.पी.पी.लॉ कॉलेज येथे अत्यंत उत्साहात पार पडला यावेळी ते बोलत होते .
यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह डॉ.स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांचा तसेच जेष्ठ नागरिक व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सभासद यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
प्रारंभी व्यसपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे, अशोक रोहमारे, राजेंद्र बापू जाधव,माजी नगराध्यक्षा ऐश्वर्या सातभाई, माजी नगराध्यक्ष विजय वहाडने,डॉ. ऍड. हिरालाल महानुभाव,डॉ. निखिल महानुभाव, श्रीकांत बागुल, तारा पाटील, गणेश देशमुख, राजेंद्र कोयटे, संतोष तांदळे, शैलेजा रोहम,राजेंद्र साळुंके, नामदेव उबाळे, अनिता निफाडकर, विजय बंब,उत्तमभाई शहा, केशव भवर, गजानन शेर्वेकर, कवी, सोमनाथ मंडाळकर, रामदास खैरे, शरद थोरात, प्रभाकर वाणी, नितीन डोंगरे, हेमचंद्र भवर, सुशांत घोडके, राजेंद्र कोयटे, सोमनाथ मंडाळकर, दिलीप सोनवणे,किरण भोईर, डॉ. चांदगुडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन तसेच दीप प्रज्वलन करून झाली.

यावेळी प्रस्ताविकात डॉ. ऍड. हिरालाला महानुभाव म्हणाले की,साहित्य हे समाजाचा आरसा असते. पण साहित्यिक हा समाजाला केवळ आरसा दाखवत नाही, तर समाजाला योग्य वाट दाखवणारा दीपस्तंभ असतो.म्हणूनच म्हणतात, एका तलवारीपेक्षा लेखणी बलवान असते. कारण तलवार फक्त माणसं मारते, पण लेखणी विचारांना जन्म देते आणि विचारच समाज घडवतात.साहित्यिक हे समाजाला दिशा देण्याचे काम करतात. त्यामुळे साहित्य परिषदचे नूतन पदाधिकारी यांचा गौरव करणे हे आमचे भाग्य असून,कोपरगाव शहराच्या साहित्य व सांस्कृतिक चळवळीला यामुळे नवी ऊर्जा मिळेल असेही शेवटी महानुभाव म्हणाले.
डॉ.स्वाती महाळंक म्हणाल्या की, आजचे जे ३०-३५ वयोगटातील तरुण आहेत, जे काही कारणास्तव मराठी साहित्यापासून थोडे दुरावले आहेत, त्यांना पुन्हा वाचनाकडे वळवणे आणि त्यांच्या मनात मराठी भाषेबद्दलची गोडी निर्माण करणे, हे प्राधान्याने करणे गरजेचे आहे.तरुणांच्या माध्यमातूनच मराठी भाषेचा हा वारसा आपण सक्षमपणे पुढे नेऊ शकतो. साहित्य परिषद ही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी परिषदेच्या प्रत्येक शाखेला सर्वोतोपरी मदत करणार आहे.
आगामी काळात १०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे पुण्यात होणार आहे.हे संमेलन ऐतिहासिक करण्याचा आमचा माणसं आहे. पुढील काळात भाषेचे संवर्धन आणि साहित्याची गोडी जनमानसात निर्माण करण्यासाठी आम्ही नियोजन करत आहोत. साहित्याची ही पालखी उद्या तरुणांच्याच खांद्यावर जाणार आहे त्यासाठी सर्वोतोपरी मदत आम्ही करणार असल्याचे ही डॉ. स्वाती महाळंक शेवटी म्हणाल्या .
प्रारंभी माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे,यांनी देखील आपले विचार मांडले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करुणा सोनवणे, श्री. वारुळे यांनी तर आभार कवी गजानन पंडित यांनी कवितेच्या माध्यमातून सर्वांचे आभार मानले.

संदीप विदुर

सदर न्युज महाराष्ट्र मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - संदीप विदुर 9975774040

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!