मुख्याध्यापक दशरथ वर्पे यांच्याकडून आदिवासी मुलांच्या वस्तीगृहासाठी 5 लाख रुपयांची देणगी
संगमनेर प्रतिनिधी संदिप विदुर – माजी शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात व मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जयहिंद आदिवासी आश्रम शाळा कोळवाडे येथे ज्ञानदानाचे काम करताना सामाजिक व पर्यावरण क्षेत्रात योगदान देणारे कृतिशील सेवाव्रती मुख्याध्यापक दशरथ विठोबा वर्पे यांनी आदिवासी व गोरगरीब विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी वस्तीगृहसाठी 5 लाख रुपयांची देणगी दिली आहे.

जयहिंद आदिवासी आश्रम शाळा कोळवाडे येथे माजी विद्यार्थ्यांच्या वतीने आयोजित सेवापुर्ती सोहळा व सेवाव्रती या गौरवग्रंथाच्या प्रकाशन कार्यक्रमात त्यांनी ही देणगी सेवाभावी ट्रस्ट साठी डॉ.जयश्रीताई थोरात यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी माजीमंत्री बाळासाहेब थोरात, मा. आ.डॉ.सुधीर तांबे, नाशिक विभागाचे आयकर आयुक्त भरत आंधळे, आदिवासी विकास विभागाचे सेवानिवृत्त अप्पर आयुक्त सूर्यकांत हिंगोनेकर, सौ.दुर्गाताई तांबे, फादर रॉबर्ट डिकोस्टा, दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी, सौ.मंगलताई वर्पे, वडील विठोबा वर्पे,उद्योजक मनीष मालपानी, विष्णुपंत रहाटळ, संपादक किसन भाऊ हासे, रामहरी कातोरे,के.के थोरात, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागातदार संघटनेचे संचालक नंदू भाऊ पवार, वूड अँड ड्रग्स चे संचालक वेदांत पाबळ, प्रा.बाबा खरात, काशिनाथ गोंदे, अक्षय वरपे, भाऊसाहेब नवले, इगतपुरी येथील नंदू गाढवे, कचरू पाटील डुकरे, यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून संगमनेर व अकोले तालुक्यातील गोरगरीब व आदिवासी विद्यार्थ्यांकरता 2 ऑक्टोबर 1994 मध्ये कोळवाडे येथे जयहिंद आदिवासी आश्रमशाळा सुरू करण्यात आली. लोकनेते बाळासाहेब थोरात व मा.आ.डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या दिवसापासून शिक्षक व मुख्याध्यापकपदाची जबाबदारी सांभाळणारे दशरथ वर्पे यांनी या शाळेच्या वाटचालीत आपले आयुष्य समर्पित केले. गुणवत्ता,शिस्त, नवनवीन योजना राबवताना शाळेला राज्यपातळीवर लौकिक मिळवून दिला.
या शाळेला राज्य पातळीवरील उत्कृष्ट आदिवासी आश्रम शाळा हा पुरस्कार मिळवून दिला.याचबरोबर शाळेच्या परिसरामध्ये सुंदर वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा मंत्र विद्यार्थ्यांना संस्काररूपी रुजवला. कोळवाडे गावच्या सामाजिक विकासात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले असून मोरया डोंगर याचबरोबर हार्मन हिल हिरवाई करण्यात त्यांनी मोठा सिंहाचा वाटा उचलला.
संगमनेर तालुक्यात दंडकारण्य अभियानाचे समन्वयक म्हणून त्यांनी अत्यंत मोठी जबाबदारी सांभाळत चांगले काम केले आहे. वृक्षारोपणाची संवर्धनाची आवड असणाऱ्या मुख्याध्यापक दशरथ वरपे यांनी सातत्याने नव्या पिढीला मार्गदर्शन केले आहे.
आपल्या कृतिशील सेवाव्रती आदर्श मधून त्यांनी जयहिंद आदिवासी आश्रम शाळेच्या गोरगरीब विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहासाठी वर्पे कुटुंबीयांच्या वतीने पाच लाख रुपयांची देणगी कुटुंबाच्या वतीने दिली आहे. या कार्यक्रमासाठी शाळेचे माजी विद्यार्थी ग्रामस्थ महिला नागरिक परिसरातील नागरिक व तालुक्यातील कार्यकर्ते विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यांच्या या कृतिशील कार्याचे महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात, मा.आ.डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ.दुर्गाताई तांबे, डॉ.जयश्रीताई थोरात, सुधाकर जोशी,रणजीत सिंह देशमुख,डॉ.हर्षल तांबे, इंद्रजीत भाऊ थोरात, शंकरराव खेमनर, संपतराव डोंगरे, रामहरी कातोरे, के.के थोरात यांच्यासह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
आदिवासी व गोरगरिबांच्या जीवनातील आनंद हा माझ्या जीवनाचा मोठा ठेवा – दशरथ वर्पेशिक्षण हे समाज प्रगतीचे माध्यम आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व फादर हारमन बाकर यांचे संस्कार घेऊन लोकनेते बाळासाहेब थोरात व मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी व गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी मी आयुष्यभर काम केले. या शाळेतून अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन मोठे झाले त्यांचे कुटुंब आज आनंदी आहे. परिसरात वृक्षराई वाढली आहे तालुक्यात दंडकारण्य अभियानामुळे वृक्ष संवर्धन संस्कृती वाढत आहे. सर्वसामान्य आदिवासी बांधवांच्या जीवनात निर्माण झालेला आनंद हे माझ्या जीवनातील सर्वात मोठे भांडवल आहे. या शाळे प्रती कृतज्ञता म्हणून माझ्या कुटुंबीयांच्या वतीने 5 लाख रुपयांची देणगी वस्तीगृहासाठी दिली आहे.







