आपला जिल्हा

एस. एस. जी. एम. महाविद्यालयाच्या विकास समितीच्या चेअरमनपदी ॲड. संदीप वर्पे

संदीप विदुर ९९७५७७४०४०

एसएसजीएममहाविद्यालयाच्या विकास समितीच्या चेअरमनपदी ॲडसंदीप वर्पे

कोपरगाव प्रतिनिधी संदीप विदुर – रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स (एस. एस. जी. एम.) महाविद्यालय, कोपरगावच्या विकास समितीच्या चेअरमपदी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य ॲड. संदीप वर्पे यांची निवड करण्यात आली आहे.

a
kopargaonghf – 1

ॲड. संदीप वर्पे यांच्या विकास समितीच्या चेअरमनपदी झालेल्या या निवडीबद्दल महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे सदस्य मा. आमदार विवेकभैय्या कोल्हे, मा. चैतालीताई काळे, मा. सुनील गंगुले, मा. महेंद्रशेठ काले,  मा.बाळासाहेब आव्हाड, मा. ज्ञानेश्वर वाकचौरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे, कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. बंडेराव तऱ्हाळ, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. घनश्याम भगत, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. अर्जुन भागवत, कार्यालय अधीक्षक श्री. सुनील गोसावी तसेच सर्व कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. याशिवाय माजी विद्यार्थी व विविध क्षेत्रांतील मान्यवरांनीही शुभेच्छा व्यक्त केल्या. ॲड. वर्पे यांच्या अनुभव संपन्न नेतृत्वाचा लाभ महाविद्यालयाच्या शैक्षणिक, भौतिक व सर्वांगीण विकासासाठी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला असून त्यांच्या निवडीमुळे विकासकामांना अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

संदीप विदुर

सदर न्युज महाराष्ट्र मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - संदीप विदुर 9975774040

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!