आपला जिल्हा

चांदेकसारे श्री कालभैरवनाथ जयंती उत्सवाची जय्यत तयारी – संदिप विदुर

सदीप विदुर +91 99757 74040

चांदेकसारे श्री कालभैरवनाथ जयंती उत्सवाची जय्यत तयारी – संदिप विदुर

१ डिसेंबरला भव्य पालखी सोहळा

कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील श्री कालभैरवनाथ देवस्थान येथे सालाबादप्रमाणे यंदाही श्री कालभैरवनाथ जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, यानिमित्त मंगळवार, दि. १ डिसेंबर २०२६ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. उत्सवाचे यंदाचे १७ वे वर्ष असून, भव्य पालखी मिरवणूक, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री कालभैरवनाथ देवस्थान प्रमुख संदीप विदुर यांनी दिली.

फ

मंगळवारी सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत श्री कालभैरवनाथ महाराजांची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्याला परिसरातील भाविक, ग्रामस्थ व भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

sandip-vidur
sandip-vidur.

या उत्सवाचे आयोजन प.पू. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज, प.पू. महंत रमेशगिरीजी महाराज, प.पू. नवनाथ महाराज खेडकर तसेच हृदय निवासी बालब्रह्मचारी प.पू. अरविंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. या सोहळ्यास समस्त कालभैरवनाथ भाविक भक्त व गावकऱ्यांचे सहकार्य लाभत आहे.

कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून श्री. संदिप विदूर (जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन, अहिल्यानगर तथा दैनिक प्रतिवीरचे कार्यकारी संपादक) यांनी पुढाकार घेतला आहे.

या उत्सवासाठी पालखीचे मानकरी म्हणून ह.भ.प. कैलास महाराज राजगुरू , जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र पोलीस बॉईज आध्यात्मिक आघाडी, अहिल्यानगर तसेच श्री. दिलीप धर्माजी होन, ट्रस्टी, बाल भैरवनाथ जोगेश्वरीदेवस्थान, चांदेकसारे यांचा सन्मान राहणार आहे. तर आरतीचे मानकरी म्हणून श्री. गणेश दत्तू शिंदे (श्रीरामनगर, निफाड) आणि श्री. शुभम शांताराम शिंदे (प्रवरा कृषी सेवा केंद्र, बेलापूर, श्रीरामपूर) यांचा सहभाग असणार आहे.

धार्मिक परंपरा, भक्तीभाव आणि सामाजिक एकतेचा संगम असलेल्या या उत्सवाच्या निमित्ताने चांदेकसारे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून, भाविकांनी पालखी मिरवणूक व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान व आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

चौकट –
स्थळ : श्री कालभैरवनाथ देवस्थान, दत्त मंदिर शेजारी, चांदेकसारे, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर

अधिक माहितीसाठी +91 99757 74040

संदीप विदुर

सदर न्युज महाराष्ट्र मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - संदीप विदुर 9975774040

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!