आपला जिल्हा

नेपाळमध्ये शिर्डीच्या विद्यार्थ्यांची सुवर्ण कामगिरी; एव्हरेस्ट इंटरनॅशनल कराटे स्पर्धेत ५ पदकांची कमाई

संदीप विदुर 9975774040

नेपाळमध्ये शिर्डीच्या विद्यार्थ्यांची सुवर्ण कामगिरी; एव्हरेस्ट इंटरनॅशनल कराटे स्पर्धेत ५ पदकांची कमाई

शिर्डी प्रतिनिधी संदीप विदुर – नेपाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या १२ व्या एव्हरेस्ट इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिपमध्ये शिर्डी येथील श्री साई निर्माण इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत एक सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्य पदकांची कमाई केली. विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशामुळे शिर्डीसह महाराष्ट्राचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झाले आहे.

ओ

 

ओ

शितो-रियो कराटे डो क्लासच्या वतीने स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी लोकेश प्रशांत रोकडे (वय गट ९ ते १०) याने रौप्यपदक, तर आर्वी अमोल देशमुख, श्लोक बालाजी मलदोडे (वय गट १२ ते १३) आणि यांनी कांस्यपदक पटकावून शाळेच्या यशात मानाचा तुरा रोवला.

श्री साई निर्माण इंग्लिश मीडियम स्कूल ही संस्था केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे, तर क्रीडा, सांस्कृतिक व सर्वांगीण विकासाच्या क्षेत्रातही विद्यार्थ्यांना सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळविलेल्या या यशामुळे शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची आणि विद्यार्थी विकासाच्या बांधिलकीची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. विजयराव कोते पाटील, उपाध्यक्ष श्री. ताराचंद कोते पाटील, प्राचार्य श्री. संदीप डांगे, उपप्राचार्य श्री. अरबाज पठाण, मुख्याध्यापक श्री. दिलीप चाफेकर तसेच शाळेतील समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या यशामागे कराटे प्रशिक्षक श्री. उज्ज्वल सोलंकी यांचे मोलाचे मार्गदर्शन व परिश्रम लाभले असून, त्यांच्या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करत शिर्डी आणि महाराष्ट्राचा गौरव वाढविला आहे.

संदीप विदुर

सदर न्युज महाराष्ट्र मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - संदीप विदुर 9975774040

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!