आपला जिल्हा

तुकाराम मुंढे यांची साखर आयुक्तपदी नियुक्ती करण्यात यावी – दिलीप लासुरे

सदीप विदुर

तुकाराम मुंढे यांची साखर आयुक्तपदी नियुक्ती करण्यात यावी – दिलीप लासुरे

कोपरगाव सदीप विदुर – राज्यातील विविध क्षेत्रात सुरू असलेला भ्रष्टाचार बंद करण्यासाठी तुकाराम मुंडे मोठ्या धाडसाने प्रयत्न करत आहे. सहकारी साखर अनेक गैरव्यवहार सुरू असून त्यातून या गैरव्यवहारांना आळा घालायचा असेल तर तुकाराम मुंडे यांची साखर आयुक्तपदी नियुक्ती करावी अशी मागणी शेतकरी नेते ऍड.दिलीप लासुरे यांनी एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे केली.

ए
आपल्या पत्रकात एडवोकेट लासुरे पुढे म्हणाले की,नुकतीच तुकाराम मुंडे यांची अन्न व औषध आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली असून नेमकी नंतर त्यांनी धडाकेबाज कामगिरी करत अन्न व औषध विभागातील अनेक बेकायदेशीर औषधांवर व माफियांवर कारवाई करण्याचा धडाका लावला आहे यापूर्वी त्यांची नियुक्ती दिव्यांग विभागाच्या आयुक्त पदावर करण्यात आली होती त्यावेळी देखील त्यांनी अनेक बोगस प्रकरणांना वाचा फोडली होती आतापर्यंत तुकाराम मुंडे यांच्या विविध ठिकाणी 26 वेळा बदली करण्यात आलेली आहे. ज्या ज्या जागेवर त्यांची बदली करण्यात येते त्या त्या विभागातील भ्रष्टाचार दूर करण्याचे काम केलेले आहे सहकारी साखर कारखानदारीत मोठा आर्थिक गैरव्यवहार होत असल्याची वेळोवेळी तक्रार केली जाते प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या उसाचा काटा मारला जात असल्याच्या तक्रारी अनेक शेतकऱ्यांनी केलेले आहेत मात्र मागील काही दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील उत्पादक शेतकऱ्यांच्या कारखान्याच्या काट्या बाबत तक्रारी आल्यास चौकशी करू अशी घोषणा केली होती मात्र प्रत्यक्षात अद्याप यावर काही एक कार्यवाही होताना दिसत नाही तसेच साखर कारखान्याच्या उपपदार्थांचे कोणतेही लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही त्यामुळे एकेकाळी शेतकऱ्यांची कामधेनू असलेले साखर कारखाने आज कारखानदारांचे सत्ता केंद्र बनलेली आहेत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक केली जात आहे अशा प्रसंगात तुकाराम मुंडे साहेबांची साखर संघाच्या साखर आयुक्तपदी नेमणूक केल्यास राज्यातील साखर कारखान्यांच्या माध्यमातून सुरू असलेला मोठा गैरव्यवहार बाहेरील असा विश्वास वाटतो राज्याचे मुख्यमंत्री भ्रष्टाचार मुक्त राज्याची घोषणा करत आहे वास्तविक अनेक साखर कारखान्यांच्या इडी व सीबीआय यांच्या नोटीसा आले आहेत म्हणजेच साखर कारखान्यांमध्ये गैरव्यवहार असल्याशिवाय अशा नोटिसा येणे शक्य नाही जर साखर आयुक्त पदी तुकाराम मुंढे सारख्या तडफदार अधिकाऱ्याची नियुक्ती झाल्यास साखर कारखान्यांच्या माध्यमातून सुरू असलेला सर्वात मोठा गैरव्यवहार बाहेरी येईल असा विश्वास वाटतो असेही लासुरे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

राजकीय नेत्यांची दुसरी तिसरी पिढी सत्तेत आली मात्र सुरुवातीच्या काळात ज्या गोरगरीब उस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखाना उभा करताना शेअर्स खरेदी केले त्यांचे शेअर्स वारसाच्या नावे वर्ग होत नाही ही सहकारा ची शोकांतिका आहे

 

संदीप विदुर

सदर न्युज महाराष्ट्र मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - संदीप विदुर 9975774040

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!