आपला जिल्हा

अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या एमबीए विभागांमध्ये 85% प्लेसमेंट

संदीप विदुर ९९७५७७४०४०

अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या एमबीए विभागांमध्ये 85% प्लेसमेंट

एनआयएसएम प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू, विद्यार्थ्यांनी उभारले स्वतःचे स्टार्टअप

60 पैकी 51 विद्यार्थ्यांना मोठ्या पॅकेजवर नोकरीची संधी

संगमनेर प्रतिनिधी संदीप विदुर – अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमधील एमबीए विभागातून मागील सत्रातील 60 पैकी 51 विद्यार्थ्यांना थेट नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या असून एमबीए अभ्यासक्रमातून प्रेरणा घेत विद्यार्थ्यांनी स्वतःचा स्टार्टअप व्यवसाय सुरू केला आहे. याचबरोबर एनआयएसएम प्रमाणपत्र अभ्यासक्रम देखील सुरू झाले असल्याची माहिती प्राचार्य डॉ.एम.ए. वेंकटेश यांनी दिली आहे.

अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज मधील एमबीए विभागातून मागील दोन वर्ष 100% प्लेसमेंट पूर्ण झाले तर यावर्षी 85 टक्के विद्यार्थ्यांना थेट नोकरीच्या संधी मिळाली आहे.8.5 लाख वार्षिक पॅकेज पासून अनेक विद्यार्थ्यांना मार्केटिंग, आर्थिक, एच.आर,माहिती तंत्रज्ञान, व्यवसाय वाढ या विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळणार आहे. टीसीएस, ॲमेझॉन,एसबीआय कार्ड्स,इंडिया मार्ट, होम स्मार्ट फायनान्स, डेटामॅटिक्स, एचडीएफसी लाइफ, बर्जर पेंट्स, बजाज फायनान्स, शिपला, सेंट गोबेन, सुला वाइन,  झेब्रामिक्स इंडिया,नोलेकसा, हिंदुस्तान फुड्स, टीडीएस कॅपिटल या विविध कंपन्यांमध्ये या विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली आहे.या विद्यार्थ्यांच्या नोकरीसाठी प्लेसमेंट ऑफिसर डॉक्टर सचिन खर्डे यांनी विशेष प्रयत्न केले आहे.

vb

एमबीए महाविद्यालयात स्टार्टअप आणि उबवणी केंद्राच्या माध्यमातून पाच विद्यार्थ्यांनी स्वतःचे व्यवसाय यशस्वीरित्या सुरू केले असून विद्यार्थ्यांना वित्तीय विकास महामंडळाच्या माध्यमातून शेअर बाजार सराव प्रसंग अभ्यास व्यवसाय आराखडा स्पर्धा याबाबतचे मार्गदर्शन दिले जाते याचबरोबर उद्योजक व स्पर्धात्मक बनवण्यासाठी एन आय एस एम हा नवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आले असल्याची माहिती विभाग प्रमुख डॉ वृषाली साबळे यांनी दिली आहे. स्वायत्त अभ्यासक्रम अंतर्गत या वर्षापासून व्यवस्थापनामध्ये गुरु छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवन वारसा रणनीती आणि गनिमी कावा या आधारित नवीन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आले असल्याची माहिती डॉ साबळे यांनी दिली आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे माजी शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात ,मा. आ. डॉ सुधीर तांबे, संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ शरयूताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे ,अकॅडमिक डायरेक्टर डॉ जे बी गुरव ,प्राचार्य डॉ एम ए व्यंकटेश, विभाग प्रमुख डॉ. वृषाली साबळे यांच्या सह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

 

आंतरराष्ट्रीय संधीसाठी जपानी भाषेचे प्रशिक्षण

अमृतवाहिनीच्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर संधी उपलब्ध व्हाव्या याकरता महाविद्यालयात साकुरा जपानी लर्निंग सेंटर सुरू करण्यात आले आहे. यामधून विविध परदेशी भाषांचे प्रशिक्षण दिले जात आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर करिअरच्या नव्या संधी उपलब्ध झाले असल्याची माहिती डॉ.वृषाली साबळे यांनी दिली आहे.

संदीप विदुर

सदर न्युज महाराष्ट्र मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - संदीप विदुर 9975774040

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!